मुलगा- बाबा, मला खूप वैताग आलाय... वडील- काय झालं बाळा..? मुलगा- सतत आईची परवानगी घ्यावी लागते.. कुठेही जाताना आईला विचारावं लागतं... वडील- अरे बाळा तू अजून लहान आहेस ना.. म्हणून आई तसं वागते.. मुलगा- आईला न विचारता बाहेर जाऊ शकेन इतका मोठा मी कधी होणार? वडील- अरे इतका मोठा तर अजून मी पण झालो नाहीए...

बायको- अहो, रॅगिंग म्हणजे काय..? नवरा- रॅगिंग म्हणजे त्रास देणे.. बायको- थोडं उलगडून सांगा हो.. नवरा- लग्नाच्या प्रत्येक वाढदिवसाला, व्हॅलेंटाईन डेला, वाढदिवसाला जबरदस्ती गिफ्ट मागून घेतेस ना.. त्यालाच इंग्रजीत रॅगिंग म्हणतात..

बायको प्रेमानं जवळ येते.. लाडीगोडी सुरू करते... बायको घट्ट मिठी मारते.. छातीवर डोकं ठेवते... प्रेमाच्या गप्पा सुरू असताना बायको अचानक गुगली टाकते... 'मी तुमच्या आयुष्यात येण्याआधी तुमचं कोणाशी अफेअर होतं का..?' यावेळी नवरा काय उत्तर देतो हे महत्त्वाचं नसतंच.. तो त्याच्या श्वासावर किती नियंत्रण ठेवतो ते महत्त्वाचं असतं.. कारण बायको त्याचं उत्तर नव्हे, हृदयाचे ठोके ऐकत असते...

रात्री बायकोनं नवऱ्याला अचानक लाथ घातली... नवरा कळवळू लागला... नवरा- लाथ का मारलीस..? बायको- डास होता... आणि मी जिवंत असताना माझ्याशिवाय दुसरं कोणी तुमचं रक्त शोषेल हे मी सहन करणार नाही...

बायको- मला सिनेमा पाहायचाय... नवरा- मग टीव्ही सुरू कर..  बघ एखादा सिनेमा... बायको- पण मला हॉरर सिनेमा पाहायचाय.. नवरा- बरं.. मग कपाटात ठेवलेली आपल्या लग्नाची सीडी घेऊन ये...

बायको- अहो ऐका ना... नवरा- बोल की... बायको- तुम्ही मूर्ख आहात की मी..? नवरा- तू अतिशय हुशार आहेस. तुझी बुद्धी अतिशय तल्लख आहे ही गोष्ट सगळेच जाणतात.. त्यामुळे तो एखाद्या मूर्ख माणसाशी लग्न करूच शकत नाहीस.. नवऱ्याचं नाव राष्ट्रपती पुरस्कारासाठी पाठवण्यात आलंय...

नवरा- जरा डोकं दाबून देतेस का..? फार दुखतंय.. बायको- हातात काम आहे माझ्या.. थोड्या वेळानं देते दाबून... नवरा- बरं.. बायको- लग्नाआधी कोण द्यायचं डोकं दाबून..? नवरा- लग्नाआधी डोकेदुखी नव्हती...

दारूच्या ग्लासालादेखील हात न लावणारी बायको पार्टीत पेगवर पेगवर पिऊन टल्ली झाली.. तिला पाहून नवऱ्याला काय करावं ते सुचेना... नवरा- अग तुझं काय चाललंय.. तुझं तुला तरी कळतंय का..? बायको- तू कोण आहेस रे..? नवरा- वेड लागलंय का तुला..? तुझ्या नवऱ्याला विसरलीस..? बायको- दारू प्यायल्यानं माणूस सर्व दु:ख विसरतो...

ज्योतिषी- तुम्हाला तुमच्या नवऱ्याच्या भविष्याबद्दल नेमकं काय जाणून घ्यायचंय..? महिला- तुम्ही मला केवळ त्याच्या भूतकाळाबद्दल सांगा हो... त्यावरून त्याचं भविष्य मीच ठरवेन...

नवरा- एखादी वस्तू ओढली की ती प्रसरण पावते... बायको- मग काय... साधं विज्ञान आहे ते... आंकुचन प्रसरण शिकलेय मी शाळेत.. नवरा- पण अशी एक वस्तू आहे जी ओढल्यावर लहान होते.. तिचा आकार कमी होतो... बायको- काहीही उगाच... नवरा- अगं खरंच.. बायको- अशी कोणती वस्तू आहे.. सांगा तुम्हीच... नवरा- सिगारेट...

नवरा- वरण असं करतात का..? अजिबात चव नाहीए.. संपूर्ण दिवसभर मोबाईलमध्ये लक्ष.. स्वयंपाकाकडे दुर्लक्ष.. तुला काही अक्कल आहे की नाही..? बायको- आधी तो मोबाईल बाजूला ठेवून ताटात लक्ष द्या.. कधीपासून पाहतेय तुम्हाला.. पाण्यात बुडवून पोळी खाताय.. वरणाची वाटी बाजूला असून दिसत नाहीए तुम्हाला...