वातदोष – वातदोषाची निरुक्ती, गुण, पर्याय, संघटन

लोक पुरुष साम्य सिद्धान्तानुसार सृष्टी व मनुष्य देहामधील क्रियात्मक साधर्म्य शिकताना आपण बघितले की, शरीर व सृष्टीमध्ये विक्षेप म्हणजेच हालचालीस कारणीभूत द्रव्य वायू आहे. शरीरामधील वातदोष निसर्गामधील वायूचे प्रतिनिधित्व करत असतो. प्रस्तुत प्रकरणामध्ये सर्वप्रथम सर्वश्रेष्ठ अशा वातदोषाची माहिती देत असताना पुढील मुद्द्यांचा विचार केला आहे

 • वातदोषाची निरुक्ती
 • वातदोषाचे गुण, पर्याय, संघटन
 • वातदोषाची सामान्य स्थाने
 • वातदोषाची सामान्य कार्ये
 • वातदोषाचे प्रकार,
 • वातदोषाची वृद्धी क्षय लक्षणे

वात हा शरीरामधील गती असलेला दोष असल्याने त्रिदोषांपैकी सर्वात महत्त्वाचा आहे.

वातदोष व्युत्पत्ती (Derivation / Etymology of word ‘Vata)

तत्र ‘वा’ गतिगन्धनयोरिति धातुः ।
गतिगन्धोपादानार्थस्य वा धातोः ‘त’ प्रत्यये ‘वात’ इति रूपम्।

वात शब्दाची निरुक्ती (Definition of word ‘Vata’)

तत्र वा गतिगन्धनयोरिति धातुः

‘वा’ या धातूच्या अर्थातून गती व गन्धन ही वातदोषाची कार्ये स्पष्ट होतात. या धातूला ‘त’ हा प्रत्यय लागून बात हा शब्द निर्माण झाला आहे.

गती म्हणजे हालचाल, गन्धन या शब्दाचा अर्थ उत्साह किंवा प्रेरणा असा आहे शरीराची हालचाल होण्यासाठी जो प्रेरणा देतो तो वातदोष अशी वातदोषाची निरुक्ती आहे.

वातदोषाचे पर्याय (Synonyms of word “Vata’)

मरुत, चल, अनिल, समीरण, पवन, प्रभंजन, अभिसखा, मातरिश्वा ही वातदोषाची पर्यायी नावे आहेत.

वातदोषाचे पांचभौतिक संघटन (Panchamahabhautik constitution of ‘Vata’)

वातदोषामध्ये वायू व अवकाश, महाभूताचे आधिक्य असते. त्यामुळे जेथे अवकाश असते त्या ठिकाणी शरीरामध्ये वातदोषाचे अस्तित्व असतेच.

वातदोषाची सामान्य स्थाने (General locations of vata dosha)

पकाशय कटीसक्थिश्रोत्रास्थि स्पर्शनेन्द्रियम् ।

स्थानं वातस्य तत्रापि पक्काधानं विशेषतः ।

वातदोषाची सामान्य स्थाने

पक्वाशय: वातदोषाचे विशेषस्थान कटीप्रदेश, सक्थिप्रदेश, श्रोत्रेंद्रिय, अस्थी

वातदोषाच्या सामान्य स्थानांचे वैशिष्ट्य

सर्वदेहव्यापित्वेऽपि यो यस्मिनाधिक्येन् वर्तते, तत् तस्य स्थानम्

सर्व दोष शरीरव्यापी आहेत तरीदेखील प्रत्येक दोषाची स्वतंत्र स्थाने वर्णन केलेली आहेत.

वातदोषाची स्वतंत्र स्थाने वर्णन करण्याचे कारण,

 1. वातदोष सर्व शरीरव्यापी आहे.
 2. परंतु सामान्य स्थानांच्या ठिकाणी वातदोष अधिक प्रमाणामध्ये उपस्थित असतो.
 3. सामान्य स्थानांच्या ठिकाणी वातदोषाचे हालचाल हे कार्य जास्त प्रमाणात असते, म्हणून वातदोषाच्या सामान्य स्थानांचे वर्णन केले आहे.

पक्वाशय वातदोषाचे विशेष स्थान असण्याचे कारण,

 1. पक्वाशय वातदोषाचे उत्पत्तिस्थान आहे.
 2. वातदोषाची विकृती झाल्यास, सर्वप्रथम पक्वाशयामध्ये वातदोषाची विकृती होते.
 3. वातदोषाचे चिकित्सास्थान पक्काशय आहे.

हे वाचा –

Share