Homeमहाराष्ट्रSerial Killer Nitin Gole Satara; साताऱ्यातील सीरियल किलर नितीन गोळे प्रकरण

Serial Killer Nitin Gole Satara; साताऱ्यातील सीरियल किलर नितीन गोळे प्रकरण

Serial Killer Nitin Gole Satara – दोन वर्षांपूर्वी पुरलेल्या मृतदेहाचा सांगाडा बाहेर काढण्यात आला असून अद्याप आरोपीची चौकशी सुरू आहे. (Serial Killer Nitin Gole Satara)

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात डॉक्टर संतोष पोळ हत्याकांडानंतर अजून एक धक्कादायक हत्याकांड समोर आले आहे.

ज्या पद्धतीने डॉक्टर पोळने अनेक खून केले होते, तशाच पद्धतीने नितीन गोळे या आरोपीने 2019 मध्ये एक आणि आता 3 ऑगस्ट रोजी असे दोन खून केल्याचे समोर आले आहे.

3 ऑगस्ट रोजी प्रेयसी संध्या शिंदे हिचा खून करून नितीन गोळे याने तिचा मृतदेह शेतात लपावल्याचं समोर आलं आहे.

नितीनने महिलेवर संशय व्यक्त करीत तिची गळा दाबून हत्या केली.

साताऱ्यातील सीरियल किलर

Serial Killer Nitin Gole Satara

भुईंज पोलिसांनी त्याच्या प्रेयसीच्या मृतदेहाचा उलघडा लावल्यानंतर पोलीस तपासात 2019 मध्ये नितीन गोळे याने पत्नी मनीषा गोळे हिचादेखील खून करून मृतदेह शेताच्या एका बाजूला असलेल्या ओढ्यात पुरला असल्याचे समोर आले आहे. (Serial Killer Nitin Gole Satara)

सध्या येथे खोदकाम करून पुरलेल्या मृतदेहाचा सांगाडा काढण्याचे काम सुरू आहे.

या घटनेची माहिती समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून शेतातील ओढ्यात एक मृतदेह पुरण्यात आला होता. महिलेच्या मृतदेहाचे सांगाडे बाहेर काढण्यात आले आहे.

सध्या तरी दोन खुनाची कबुली या आरोपीने दिली अजून काही खून केले आहेत का याचा तपास पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments