आयुर्वेदाचे मूलभूत सिद्धांत – Principles of Ayurveda

कोणतेही शास्त्र मग ते फिजिक्स, केमिस्ट्री असो किंवा आयुर्वेदासारखे प्राचीन शास्त्र असो, प्रत्येक शास्त्राचे स्वतःचे नियम, तत्त्वे किंवा सिद्धान्त असतात. शास्त्राची मूलभूत तत्त्वे ही त्या शास्त्राचा पाया असतात. शास्त्राचा विकास हा सिद्धान्तावरच असतो. केमिस्ट्रीमध्ये बोहर, डाल्टन या शास्त्रज्ञांनी अँटोमिक थिअरी मांडली व मगच केमिस्ट्रीची प्रगती झाली. न्यूटन्समुळेच फिजिक्सचा विकास झाला.

त्याचप्रमाणे आयुर्वेदाचे सिद्धान्त आजही सिद्ध करता येतात. आयुर्वेदाचे सर्व मूलभूत सिद्धान्त अनादि, शास्वत आणि नित्य आहेत. हजारो वर्षानंतरही आज या सिद्धान्त बदल झालेला नाही. म्हणूनच काळाच्या ओघात आयुर्वेद टिकून आहे.

सिद्धान्त व्याख्या सिद्धान्तो नाम स यः परिक्षकैर्बहुविधं परिक्ष्य हेतुभिश्च साधयित्वा स्थाप्यते निर्णयः ।।

परीक्षकांनी अनेक प्रकारे परीक्षा करून सिद्ध केलेला निर्णय म्हणजे सिद्धान्त.

शारीरक्रिया विषयामध्ये मूलभूत सिद्धान्ताचे महत्त्व

 1. शरीराच्या निर्मितीघटकाबद्दल ज्ञान होते.
 2. दोष धातू मलांच्या गुणकार्याचे ज्ञान होते.
 3. विकृती व चिकित्सा कोणत्या तत्त्वांनुसार करणे आवश्यक आहे त्याचे ज्ञान होते, त्यामुळेच शारीरक्रिया शिकत असताना मूलभूत सिद्धान्त शिकणे महत्त्वाचे आहे.

आयुर्वेदाचे मूलभूत सिद्धान्त

 1. पुरुषोऽयं लोक संमिता लोकपुरुष साम्य सिद्धान्त
 2. पंचमहाभूत विकार समुदायात्मकं शरीरम् अर्थात शरीरामधील पांचभौतिक अंश
 3. दोषधातुमलस्य पांचभौतिकत्वं
 4. दोषधातुमल मूलं हि शरीरम्
 5. सामान्य विशेष सिद्धान्त
 6. रोग (Diseases) – आरोग्य कारणम्
 7. रोग – आरोग्य लक्षणम्
 8. द्रव्य-गुण-कर्म सिद्धान्त
 9. कार्यकारण सिद्धान्त
 10. पंचमहाभूत-त्रिगुण-त्रिदोष संबंध.

पुरुषोऽयं लोक संमिता लोकपुरुष साम्य सिद्धान्त

पुरुषोऽयं लोक संमिता लोकपुरुष साम्य सिद्धान्त आयुर्वेदामधील हा सर्वांत महत्त्वाचा सिद्धान्त आहे. प्राचीन शास्त्रज्ञ अथवा ऋषींनी हजारो वर्षे सृष्टी व मनुष्याचे निरीक्षण केल्यावर सृष्टी व मनुष्य या दोघांत त्यांना जे साम्य आढळले, ते म्हणजे सृष्टीत जी तत्त्वे आहेत, तीच तत्त्वे सूक्ष्म अंशाने मनुष्यातही आहेत. म्हणजेच मनुष्य हा सृष्टीची लहान प्रतिकृती आहे.

लोक म्हणजे सृष्टी, पुरुष म्हणजे मनुष्य. सृष्टी व मनुष्य यांच्यामधील साम्य या सिद्धान्तामधून सांगितले आहे. यावन्तो हि लोके (मूर्तिमन्तो) भावविशेषास्तावन्तः पुरुषे यावन्तः पुरुषे तावन्तो लोके सृष्टीमध्ये जेवढे भावपदार्थ आहेत तेच भावपदार्थ मनुष्यदेहामध्ये आहेत. या सिद्धान्ताला पिंड ब्रह्मांड न्याय असेही म्हणतात. या न्यायानुसार सृष्टीमधील सर्व पदार्थांचा उपयोग मनुष्यातील व्याधी बरा करण्यासाठी करता येतो.

चरक संहितेमध्ये शारीरस्थानामध्ये पुरुषविचय शारीर नावाच्या अध्यायात निसर्गामधील भाव व त्यांचे पुरुष शरीरामध्ये असलेल्या स्वरूपाचे वर्णन केलेले आहे. तस्य पुरुषस्य पृथिवी मूर्तिः आपः क्लेद: तेजोऽभिसन्ताप:, वायुः प्राणः, वियत् सुषिराणि ब्रह्म अन्तरात्मा

चरकसंहितेमध्ये सृष्टी व मनुष्य शरीराची केलेली तुलना

हे वाचा –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *