HomeCrimeNursing Student rape video news - गुंगीचे औषध देऊन मित्रानेच केला बलात्कार...

Nursing Student rape video news – गुंगीचे औषध देऊन मित्रानेच केला बलात्कार 08/09/2021

Nursing Student rape video news – भोपाळमध्ये एका नर्सिंग विद्यार्थिनीसोबत मित्रानेच बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना 14 ऑगस्ट रोजी घडली जेव्हा आरोपी गोविंद अहिरवारने पीडितेला महाविद्यालयात सोडतो म्हणून सांगीतले. Bopal Rape Case, Nursing Student rape, rape video news, video news

पीडित आणि आरोपी एकाच महाविद्यालयात शिकतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीला महाविद्यालयात सोडत असताना आरोपीने त्याची कार एका हॉटेल जवळ थांबवली आणि काही खाद्यपदार्थ खरेदी केले. जेवणानंतर पिडीत मुलगी बेशुद्धी झाली.

Nursing Student rape video news

यानंतर आरोपी तिला निशाटपुरा येथील भाड्याच्या घरात घेऊन गेला. त्याने खोलीत नेऊन पिडीतेवर बलात्कार केला आणि या कृत्याचे चित्रीकरण केले.

यानंतर आरोपीने पीडितेला धमकी देऊन ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. निराश झालेल्या पीडितेने अलिराजपूर जिल्ह्यातील तिच्या पालकांकडे जाऊन त्यांना सर्व काही सांगितले. (Nursing Student rape video news)

अलिराजपूर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. हे प्रकरण आता भोपाळच्या निशातपुरा पोलिस स्टेशनला हस्तांतरित करण्यात आले असून तपास सुरू आहे.

पोलिसांनी मंगळवारी दावा केला की आरोपीच्या भाड्याच्या घरावर छापे टाकण्यात आले, पण तो फरार झाला. पोलिसांनी सांगितले की आम्ही त्याच्या काही संभाव्य ठिकाणी छापे घातले आहेत

पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी गुन्हा केल्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देत ​​होता आणि सोशल मीडिया साइटवर तिचे फोटो आणि व्हिडिओ प्रसिद्ध करण्याची धमकीही देत ​​होता.

हे ही वाचा

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments