ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्र होऊ शकतो मास्क मुक्त अन् 100 टक्के अनलॉक

Unlock Maharashtra : मुंबई : कोरोनाचा (Corona virus) संसर्ग (Infection) कमी झाला असून तिसरी लाट(Third Wave) ओसरू लागली आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गाचे 21,016 नवीन रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान 325 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, जो फेब्रुवारीतील सर्वात कमी आकडा आहे. देशात (India) आतापर्यंत 4.28 कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचवेळी, 5.11 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.  

दिल्ली एम्सचे संचालक डॉ रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे की, देशातील लसीकरण मोहिमेमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कमी झाला आहे. अशात राज्यातील नागरिकांना एक दिलासा देणारी बातमी हाती आली आहे.  गेल्या राज्यात 24 तासांत 2068 नव्या कोरोना रुग्णांची आणि 15 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. ही तिसरी लाट कमी होत असल्याचं संकेत मानले जात असून राज्यात मार्चनंतरच शंभर टक्के अनलॉक होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, तिसरी लाट आटोक्यात आल्यानंतरही दररोज शेकडो रूग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे राज्याच्या टास्क फोर्सने सावध पवित्रा घेत मास्क मुक्तीचा निर्णयही मार्चनंतरच घेण्याचा विचार केला आहे. ब्रिटनमध्ये डेल्टाक्रोनसारखा नवीन व्हेरियंट आढळला आहे. यामुळे अजून थोडावेळ अनलॉक करण्यासाठी घेतला जाणार आहे. कोरोना निर्बंधात (Corona restrictions) शिथिलता आणण्याच्या सूचना राज्यांना केंद्र सरकारने केल्या आहेत. त्यानुसार  हालचाली सुरु झाल्या आहेत. मात्र, राज्य सरकारने सावध पवित्रा घेतला आहे. 

दरम्यान, लवकरच कोरोनाच्या निर्बंधातून लवकरच सुटका होण्याची शक्यता आहे. रुग्णसंख्या कमी होत असल्याने केंद्राकडून (Central Government) राज्यांना निर्बंध शिथिल करण्याच्या सूचना केल्या आहेत. जवळपास गेल्या तीन वर्षांपासून कोरोनाने देशातील नागरिकांना हैराण केले आहे. दरम्यान सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. राज्य कोरोनावरील कडक निर्बंधाबाबत पुर्नविचार केला जाण्याची शक्यता आहे. याबाबतचे पत्र केंद्रीय आरोग्य सचिव (Union Health Secretary) राजेश भूषण (Rajesh Bhushan) यांनी राज्याच्या सचिवांना लिहिले आहे. त्यानुसार राज्य सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. मात्र टास्क फोर्सने सावध पवित्रा घेताना सध्या काही प्रमाणात रुग्णवाढ होत असल्याने मार्च 2022 नंतर अनलॉक होणार आहे.