कफदोष – Definition, सामान्य स्थाने

शरीराच्या वृद्धीसाठी आवश्यक असणारा तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे कफदोष, या कफदोषाबद्दलची सविस्तर माहिती देत आहोत.

कफदोष निरुक्ती (Definition)

केन (जलन) फलति इति कफः शब्दकल्पद्रुम

ज्या द्रव्यामुळे शरीरघटकांची वृद्धी होते त्या द्रव्यास कफदोष असे म्हणतात. ज्याप्रमाणे पाणी वृद्धीसाठी आवश्यक आहे, त्याचप्रमाणे कफदोषदेखील शरीरवृद्धीसाठी आवश्यक आहे.

कफदोषाची पर्यायी नावे ( Synonyms)

श्लेष्मा आणि बलास ही कफदोषाची पर्यायी नावे आहेत. श्लेष्मा हा शब्द ‘श्लिष अलिंगने‘ या धातूपासून बनलेला आहे. जे द्रव्य शरीरघटकांना जोडून ठेवते त्या द्रव्याला श्लेष्मा असे म्हटले आहे. बलास या शब्दाचा अर्थ बल किंवा वजन असा आहे. शरीराचे बल कफदोषावर अवलंबून असल्याने कफदोषास बलास असा पर्यायी शब्द वापरला आहे.

कफदोषाचे पांचभौतिक संघटन

अम्भः पृथिवीभ्यां श्लेष्मा

कफदोषामध्ये पृथ्वी व जल महाभूताचे आधिक्य आहे. कफदोषामधील पृथ्वीव जलामहाभूतामुळे शरीराला स्थिरत्व प्राप्त होऊन शरीराची वृद्धी होते.

कफदोष जरी सर्व शरीरव्यापी असला, तरी शरीराच्या विशिष्ट भागामध्ये कफदोषाचे कार्य प्रकर्षाने दिसते, म्हणून कफदोषांच्या सामान्य स्थानांची माहिती असणे आवश्यक आहे. कफदोष स्वभावतः हृदय व हृदयाच्या ऊर्ध्व प्रदेशामध्ये जास्त प्रमाणामध्ये असतो.

कफदोषाची सामान्य स्थाने

उर: प्रदेश (thoracic cavity) शिर: प्रदेश (head region)
शिर: प्रदेश (head region)पर्वसंधी (interphalangeal joints)
रसधातू घ्राणप्रदेश (nasal cavity )कंठ (throat / Pharynx)
क्लोम (pancreas/Palate)आमाशय (stomach)

१) उर:प्रदेश:

चरक संहितेनुसार उर: प्रदेश हे कफदोषाचे प्रमुख स्थान आहे. कफदोषाचे श्वास (asthma), कास (cough) इत्यादी विकार प्रामुख्याने उरःस्थानाच्या आश्रयाने होत असल्याने, उर: प्रदेश हे कफदोषाचे प्रमुख स्थान, सांगितलेले आहे.

उर: प्रदेशाचे वैशिष्ट्य

उर: प्रदेशामध्ये (chest cavity / thorax) प्रामुख्याने हृदय व फुप्फुस या अवयवांचा समावेश होतो. रसरक्तसंवहनासाठी हृदय तसेच श्वसनासाठी हृदयाची व फुफ्फुसाची सतत हालचाल उर: प्रदेशामध्ये होत असते. प्राण, व्यान व उदानवायूचे स्थान हृदय व फुफ्फुस आहे, त्यामुळे सतत गतिमान असणाऱ्या हृदय व फुप्फुसांना बल देण्याचे, स्थिरता देण्याचे कार्य उरः स्थानामधील कफदोष करत असतो, उर:स्थानामध्ये हृदय व फुफ्फुसांच्या हालचाली होताना घर्षण होऊ नये म्हणून या ठिकाणी स्निग्ध गुणाचा कफदोष कार्यशील असतो.

उरःस्थानामध्ये स्निग्ध कफदोषामुळे हृदय व फुप्फुसांना सतत पोषण मिळून या अवयवांची झीज टाळली जाते. हृदय व पुस्फुसाभोवती असणाऱ्या आवरणामध्ये श्लक्ष्ण गुणाचा कफदोष या अवयवांचे संरक्षण करतो.

२) कंठप्रदेश:

कंठप्रदेश हा नाक व मुखकुहरामधील सामायिक मार्ग (common passage) आहे. नाकामधून हवा घशामधून श्वासनलिकेत (trachea ) जाते व तेथून फुफुसामध्ये येते. मुखामधील अन्न व पाणी घशामधून अन्ननलिकेत व तेथून आमाशयामध्ये येते..

कंठप्रदेशातील कफदोषामुळे कंठामध्ये कायम आर्द्रता (ओलसरपणा) राखली जाते व त्यामुळे अन्न, पाणी व हवा हे अनुक्रमे घटक कंठामधून / अन्ननलिकेमध्ये तसेच श्वासनलिकेमध्ये प्रवेशित होऊन पुढे जातात. कंठामधील कफाच्या श्लक्ष्णत्वामुळे अन्न, पाणी व हवेमधील शरीराला अपायकारक घटक कंठामध्ये अडकले गेल्याने या अपायकारक घटकांपासून शरीराचे संरक्षण होते.

३) घ्राणप्रदेश:

घ्राण म्हणजे नासागुहा होय. प्राणप्रदेशामध्ये असलेल्या कफदोषामुळे नासागुहा स्निग्ध व आर्द्र राहते. नाकातून आत घेतलेली रूक्ष हवा, नासा गुहेतील आई कफदोषामुळे आर्द्र होते व हवेतील शरीराला अपायकारक असलेले पटक नाकामधील स्निग्ध कफामध्ये अडकले जातात व हवा गाळून घशामध्ये येते. हृदयाचे नाक, घसा व उर:स्थानातील कफदोषामुळे प्राणवहस्रोतसाचे हवेतील धूळ, धूर इत्यादी अपायकारक घटकांपासून तसेच विकारांपासून संरक्षण केले जाते.

४) शिर:

प्रदेश शिर प्रदेशामधील कपालास्थीच्या (cranial bones) अंतर्भागामध्ये मस्तिष्क (cerebrum) आहे. शिरः प्रदेशामध्ये प्राणवायूचे स्थान आहे. तसेच शिरः प्रदेशामध्ये ज्ञानेंद्रियांची सूक्ष्म केंद्रे आहेत.

शिरःस्थ प्राणवायू सर्व शरीराच्या हालचालींवर नियंत्रण ठेवतो, तर मस्तिष्कामधील ज्ञानेंद्रियांची सूक्ष्म केंद्रे सतत कार्यशील असतात. मस्तिष्कामधील सूक्ष्म इंद्रियांचे पोषण करून तर्पण करणे हे महत्त्वाचे कार्य शिरः स्थानामधील कफदोष करत असतो.

शिरःप्रदेशातील स्निग्ध, सांद्र, श्लक्ष्ण कफामुळे शिरः प्रदेशातील मस्तिष्काचे (cerebrum) आघातापासून (trauma) संरक्षण केले जाते. तसेच याच कफामुळे मस्तिष्काचे अपायकारक घटकांपासून संरक्षण केले जाते. केवळ मस्तिष्काभोवती हा कफदोष नसतो, तर सुषुम्नेच्या अंतर्भागामध्ये (central canal of spinal cord) हाच कफदोष स्नेहनाचे कार्य करतो. शिरःस्थ कफाची तुलना सेरिब्रोस्पायनल फ्लुईडशी करता येते.

५) क्लोम:

क्लोम म्हणजे नेमका कोणता अवयव आहे, आयुर्वेदिक तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. याबद्दल आजही क्लोम या शब्दाचे दोन अर्थ केले जातात : तालु (palate) किंवा अग्न्याशय (pancreas) उदकवह स्रोतसाचे मूलस्थान म्हणून क्लोम या अवयवाचा उल्लेख आलेला आहे.

उदकवह स्रोतस शरीरामधील पाण्यावर नियंत्रण ठेवते, कफदोषामध्ये देखील जल महाभूताचे आधिक्य आहे, कफदोषामधील द्रवत्वाच्या वृद्धी, क्षयाचा परिणाम उदकवह स्रोतसाच्या मूलस्थानांवर होत असल्याने, क्लोम हे कफदोषाचे स्थान सांगितले आहे.

हे वाचा –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *