Homeमराठी तडका‘हेराफेरी’ चित्रपटात झळकलेली छोटी रिंकू 21 वर्षानंतर दिसते अशी, सौंदर्याच्या बाबतीत अभिनेत्रींनाही...

‘हेराफेरी’ चित्रपटात झळकलेली छोटी रिंकू 21 वर्षानंतर दिसते अशी, सौंदर्याच्या बाबतीत अभिनेत्रींनाही देते टक्कर…

रुपेरी पडद्यावर 2000 मध्ये सुपरहिट ठरलेला चित्रपट म्हणजे हेराफेरी.हा चित्रपट रसिकांना भावला आणि चित्रपटातील कलाकारांना तसंच त्यांच्या भूमिकांना रसिकांनी डोक्यावर घेतलं.अक्षय कुमारचा अतरंगी अंदाज आणि त्याला सुनील शेट्टी आणि परेश रावलयांचा कॉमेडी बाज रसिकांना भावला.

शिवाय तब्बुच्याही भूमिकेने रसिकांची पसंती मिळवली होती. अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल या तिकडीने तर रसिकांना हसून हसून लोटपोट केले होते.सिनेमा प्रदर्शित होवून इतकी वर्ष झाली तर आजही जादू कायम आहे.

‘हेरा फेरी’ तिसरा भागही रसिकांच्या भेटीला येणार आहे. सध्या त्याच्यावर काम सुरु असल्याचे परेश रावल यांनी सांगितले होते. आजही हा सिनेमा तितक्याच आवडीने पाहिला जातो.हेराफेरी या चित्रपटात

बालकलाकार रिंकू उर्फ एलेक्सिया अनाराच्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली होती. जिथे हेराफेरी 2 ची कथा संपते तिथून तिसऱ्या भागाला सुरुवात होणार असून कथा, पटकथा आणि संवाद यावर जास्तीत जास्त काम करत आहोत.

किडनॅप झालेल्या मुलीची भूमिकेत ती झळकली होती. छोटी तिच्या भूमिका असली तरी तिची भूमिका लक्षवेधी ठरली होती. आता एलेक्सिया अनारा आता फार मोठी झाली आहे. तिच्या लूकमध्येही फार बदल झाला आहे. हेराफेरीमध्ये झळकलेली रिंकू आथा काय करते ?, ती कशी दिसते असे प्रश्न तुम्हाला पडले असतील.

तिचा लूक पाहून तुम्ही तिला ओळखणारही नाही. रिंकू आता 31 वर्षांची झाली आहे.आपलं शिक्षण पूर्ण करत असताना ती अभिनयापासून दूर गेली. तिचा कोणताही नवा चित्रपट आलेला नाही. सोशल मीडियावर नजर टाकल्यास तिच्या विविध अंदाजातील फोटो पाहायला मिळतील.

बोल्ड आणि बिनधास्त अशा अंदाजातील तिचे फोटो पाहून तुम्हीही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. इतकी ती स्टायलिश दिसते. तिचे असे फोटो पाहून हेराफेरीमधली हीच का ती असाही प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. चाहते तिच्या स्टाईलवर फुल ऑन फिदा असतात.

सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने ती चाहत्यांवर मोहिनी घालत असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर ती प्रचंड लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्याही प्रचंड आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments