आम्लरस – लक्षणे, गुण व कार्ये, शरीरार होणारे परिणाम

आम्लरसाची लक्षणे

आम्लः क्षालयते मुखम्।

हर्षणो रोमदन्तानां अक्षिध्रुवनिकोचनः ।।

आम्लरसामुळे तोंडाला पाणी सुटते, अंगावर रोमांच उभे राहतात, दात आंबतात आणि डोळे(eyes) व भुवया आकुंचित होतात. चिंच किंवा कैरी सारखे आंबट पदार्थ बघितले तरी वरील लक्षणे शरीरामध्ये निर्माण होतात.

आम्ल रसाचे गुण व कार्ये

आम्ल अमिदीभिकृत् स्निग्धो हृदयः पाचनरोचनः ।

उष्णवीर्यो हिमस्पर्शः प्रीणनः क्लेदनो लघुः ।

करोति कफपित्तास्त्रं मूढवातानुलोमन: ।

आम्लरसाचे गुण:

आम्ल रस स्निग्ध, उष्ण व लघु गुणाचा असून, आम्ल रसाची द्रव्ये स्पर्शाला शीतगुणाची असतात.

आम्लरसाची कार्ये:

आम्लरस उष्ण गुणामुळे अग्निदीपन करून पचन योग्य प्रकारे घडवून आणतो.. आम्लरसामुळे हृदयाचे प्रीणन व पोषण होत असल्याने, आम्लरस हृद्य आहे. आम्लरसामुळे रोचन कार्य होऊन तोंडामध्ये चव निर्माण होते. आम्लरसामुळे शरीरामधील सर्व स्राव वाढत असल्याने, आम्लरस क्लेदनाचे कार्य करतो.

आम्लरसामुळे वातानुलोमन होत असल्याने, अन्नाचे अपकर्षण होते व अन्न आमाशयामधून पुढे पुढे ढकलले जाते. आम्लरसाच्या सेवनामुळे कफ व पित्तवृद्धी होते. रक्तधातूच्या वृद्धीसाठी आम्लरसात्मक द्रव्ये उपयुक्त ठरतात.

आम्लरसाची आहारीय द्रव्ये: निंबूक, आमलकी, कवठ, वृक्षाम्ल (आमसूल), कैरी, चिंच, दाडिम, चुका, अंबाडी.

आम्लरसाचे शरीरार होणारे परिणाम:

  1. अफ्रिदीपन करणे.
  2. अन पचनास मदत करणे.
  3. लालास्राव, पाचक स्रावांचे स्रवण वाढविणे.
  4. हृदयाला बल देणे.
  5. कफदोष व पित्तदोषाची वृद्धी करणे.
  6. रक्तधातूची वृद्धी करणे.
  7. वातानुलोमन करणे.

आम्लरसाच्या अतिसेवनामुळे पित्तवृद्धी व रक्तवृद्धी होते.

हे वाचा –

Share