आहार – आहाराची शरीराला असणारी आवश्यकता, शरीरावर होणारे परिणाम

प्रत्येक क्षणाला झिजते ते शरीर शीर्यते इति शरीरम्, अशी शरीर या शब्दाची व्याख्या केली जाते. हृदय, फुफ्फुस, वृक्क, यकृत, मांसपेशी, आंत्र या अवयवांचे कार्य शरीरामध्ये सतत सुरू असल्याने घातूंची सतत झीज होत असते. शारीरक्रियांमध्ये होणारी झीज भरून काढण्यासाठी शरीराला अन्न, पाणी आणि हवेची गरज असते. यांच्या माध्यमातून शरीरअवयवांना कार्य करण्यासाठी ऊर्जा मिळते. अन्न, पाणी आणि हवा या तीन घटकांना आयुर्वेदाने बाह्यप्राण म्हटले आहे. या बाह्यप्राणांपैकी हवेचा विनियो शरीरामध्ये कशा प्रकारे केला जातो हे आपण श्वसनप्रक्रियाया प्रकरणामध्ये पाहिले आहे.

प्रस्तुत प्रकरणामध्ये आयुर्वेदशास्त्रामधील आहार संकल्पनेविषयी माहिती देत आहोत. आहार संकल्पनेविषयाची माहिती घेत असताना (१) आहार म्हणजे काय? (२) आहाराची आवश्यकता, (३) आहारीय द्रव्यांचे आयुर्वेदशास्त्रामधील वर्गीकरण, (४) आधुनिक शास्त्रामधील आहारीय द्रव्य वर्गीकरण संकल्पना इत्यादी विषयांचा आढा घेतला जाणार आहे.

तीन उपस्तंभ

[प्रय उपस्तम्भा इति आहारः, स्वप्नो, ब्रह्मचर्यमिति…..]।

आहार, निद्रा (स्वप्न) व ब्रह्मचर्य हे तीन आयुष्याचे उपस्तंभ (आधार) आहेत. योग्य प्रमाणामध्ये घेतलेला आहार, निद्रा व ब्रह्मचर्यामुळे आरोग्य रक्षण होते, म्हणून यांना शरीराचे उपस्तंभ म्हटले आहे.

आहार शब्दाची व्याख्या (Definition of Ahara)

शरीराच्या पोषणासाठी घेतल्या जाणाऱ्या द्रव्यास आहार असे म्हणतात.

आहार शब्दाचे पर्याय: भक्षण, निगर, अशनम्, अभ्यवहार इत्यादी.

आहाराची शरीराला असणारी आवश्यकता (Significance of Ahara)

प्राणिनां पुनर्मूलमाहारो बलवर्णीजसां

सर्व प्राण्यांना आहाराची आवश्यकता असल्याने, आहार हे सर्व प्राणिमात्रांच्या आयुष्याचे मूल (कारण) आहे. शरीराचे बल (Physical strength), त्वचेची कांती व सर्व धातूंचे सार असलेले ओज हे तीनही भाव आहारावरच अवलंबून आहेत. तैत्तरिय उपनिषदामध्ये मनुष्याची उत्पत्ती आहारापासूनच झालेली आहे अशा अर्थाचे सूत्र आहे.

आकाशात् वायूः, वायोस्तेजः, तेजस: उदकम्, उदकात् पृथिवी, पृथव्या

औषधयः, औषधिभ्यो अन्नम्, अन्नात् पुरुषः । तैत्तरिय उपनिषद

मनुष्याचे आयुष्य अन्नावरच अवलंबून असल्याने, प्रत्येकाला आहाराबद्दल ज्ञान असणे आवश्यक आहे.

आहाराचे शरीरावर होणारे परिणाम

प्राणा: प्राणाभृतामन्नमन्नं लोकोऽभिधावति ।

वर्णः प्रसादः सौस्वर्यं जीवितं प्रतिभासुखम् ।

तुष्टिः पुष्टिर्बलं मेधा सर्वमन्ने प्रतिष्ठितम् ।

सर्व प्राणिमात्रांचा प्राण (आयुष्य) अन्नावर अवलंबून असल्याने, अन्नप्राप्तीसाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. त्वचेचा प्राकृत वर्ण, स्वर, आयुष्य, कल्पनाशक्ती (प्रतिभा), सुख, आनंद, धातुपोषण, शरीरबल, ग्रहणशक्ती (मेधा ) या सर्व गोष्टी अन्नावर अवलंबून असल्याने मनुष्याने, योग्य प्रकारे आहार सेवन करणे आवश्यक आहे.

अन्नपानेन्धनैश्चाग्निर्ज्वलति व्येति चान्यथा ।

अन्न हे शरीरामधील अग्नीचे इंधन आहे, अन्नरूपी इंधनामुळे अग्नी प्रज्वलित होतो व हे इंधन न मिळाल्यास अग्नी विझून जातो.

आहाराची कार्ये

  1. जाठराग्नी प्रदीप्त करणे.
  2. धातूपोषण करणे.
  3. शरीराचे बल योग्य आहारावर अवलंबून आहे.
  4. योग्य आहारामुळे होणाऱ्या शरीरपोषणाचे प्रतिबिंब मनुष्याच्या त्वचेवर • दिसते व त्वचा अतिशय स्निग्ध दिसते व त्वचेचा वर्ण सतेज दिसतो.
  5. योग्य आहारामुळे मनाच्या आरोग्याचे रक्षण होऊन बुद्धी, मेधा हे मानसिक भाव योग्य प्रकारे कार्य करतात. अशा प्रकारे शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी योग्य आहाराची आवश्यकता असते. स्वतःसाठी योग्य व अयोग्य आहार कोणता हे निश्चित करण्यासाठी आयुर्वेदामधील

हे वाचा –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *